बीड: उदगिरच्‍या माजी आमदारांच्या गाडीला अपघात

बीड: उदगिरच्‍या माजी आमदारांच्या गाडीला अपघात

बीड – उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्या गाडीची आणि दुचाकीच्या झालेल्या धडकेत तीन युवक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास लातूरला हलविण्यात आले आहे. हा अपघात परळी – धर्मापुरी रस्त्यावर आज  झाला. 

 

परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील किशोर दहिफळे (वय १८), विष्णु ज्ञानोबा आघाव (वय १७) आणि दिपक दहिफळे (वय १७) हे तीन युवक हिरो होंडा पॅशन (MH 44 P 6857) वरून धर्मापुरीकडे परिक्षेसाठी जात असताना त्यांची आणि समोरून येणारे माजी आमदार गोविंद यांच्या इनोव्हा क्रिस्टा (MH 24 AP 21) या गाडीची जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील तिघेही युवक जखमी झाले. जखमी तिन्ही युवकांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता विष्णु आघाव याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.

 

दरम्यान, माजी आ. गोविंद केंद्रे यांनी नंतर स्वाराती रूग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

 

COMMENTS