नागपूर – बीफ बाळगल्याच्या संशयावरून एकाला जमावाकडून बेदम मारहाण

नागपूर – बीफ बाळगल्याच्या संशयावरून एकाला जमावाकडून बेदम मारहाण

नागपूर – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांना हिंसा करू नये म्हणून समज देत असतात. तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसणे तर दूरच उलट यामध्ये वाढ होत असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीस बीफ नेत असल्याच्या संशयावरुन शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील भारसिंगी गावात सलीम इस्माईल शाह नावाच्या व्यक्तीला तो दुचाकी गाडीत गोमांस नेत असल्याच्या संशयावरून मारहाण केली. सलीमच्या गाडीत गोमांस असल्याचा आरोप लावत गोरक्षकांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सलीमला जमावाच्या तावडीतून सोडवले.

या प्रकरणी चौघांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या चौघांना गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. मोरेश्वर तांदूळकर, जगदीश चौधरी, अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

या प्रकरणी पोलीस म्हणाले की, सध्या सापडलेले मांस परीक्षणाकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत त्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत यावर काही भाष्य केले जाऊ शकत नाही. फॉरेन्सिक लॅबचा निकाल आला की त्यानंतर पोलीस योग्य ती कारवाई करतील.

 

COMMENTS