राज्यात विहीरी आणि वोअरवेलमुळे जमिनीची एवढी चाळण झाली आहे की विचारता सोय नाही. हजारो फूट खोल बोअर खोदूनही अनेकवेळा पाणी लागत नाही. मात्र एका बोअरवेलला एवढं पाणी लागलं आहे. की ते पाणी उंच आकाशात झेपावत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील हा व्हिडिओ आहे. कारण तिथलं संभाषण हे मराठीमधील आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच महाराष्ट्रातला दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यातील पढेगाव इथला हा बोअरवेल असल्याचं कळतंय. मात्र याची शहानिशा अजून होऊ शकलेली नाही.
COMMENTS