‘शेतक-यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारेच खरे देशद्रोही आहे . स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्या ऐवजी ब्रिटिशांची भलावण करणा-या संघटनांना गुरुस्थानी मानणारांनी शेतक-यांना देशभक्ती शिकवू नये.’ अशी टीका सुकाणू समितीचे संयोजक डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यावर केली.
‘खा-या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा म्हणून अटी शर्ती असतील व त्यामुळे नियमित कर्ज भरणारे, सावकारांकडून,पतसंस्थांकडून कर्ज घेणारे, सिंचन, पॉलीहाउस व शेडनेट साठी कर्ज घेणारे वंचित राहणार असल्याने खरे शेतकरी ठरणार नसतील तर मग खरे शेतकरी नागपूरच्या रेशीम बागेत शोधायचे का ?’ असा सवाल डॉ. अजित नवले यांनी केला.
‘शेतकरी कर्जमाफीची मागणी अराजक पसरविणारी असेल तर विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री अशीच मागणी करून अराजकच पसरवीत होते काय ? शेतक-यांची कर्जमाफीची मागणी म्हणजे देशद्रोह व अराजक व कॉर्पोरेट कंपन्यांची करमाफी, कर्जमाफी म्हणजे देशप्रेम व सुशासन हा कुठला न्याय …?’ असे अजित नवले यांनी म्हटलं आहे.
COMMENTS