अरविंद केजरीवाल यांना 5 हजार रुपयांचा दंड !

अरविंद केजरीवाल यांना 5 हजार रुपयांचा दंड !

दिल्ली –  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने  5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. जेटलींनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यास उशीर केल्याबद्दल न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये अनियमितता असून अरुण जेटली यांचा यामागे हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. या प्रकरणी जेटली यांनी केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतरही केजरीवाल यांनी जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे संतापलेल्या जेटली यांनी केजरीवालांविरोधात 10 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

COMMENTS