रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती,  25 जुलैला शपथविधी

रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती, 25 जुलैला शपथविधी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 7 लाख 2 हजार 44 मतांनी विजय होत रामनाथ कोविंद भारताचे 14 वे राष्ट्रपती ठरले आहे. रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उभ्या असलेल्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना 34 टक्के मतं मिळाली. येत्या 25 तारखेला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतील.

कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. 1994 ते 2006 पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते. त्याआधी ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. पेशाने ते वकील आहेत. आयएएससाठीही त्यांची निवड झाली होती. पण त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही. त्यांनी लॉमध्ये करिअर करायचं ठरवलं. दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांनी 2 वर्षं काम केलं. पत्नी सविता, एक मुलगी स्वाती आणि मुलगा प्रशांत कुमार असा त्यांचा परिवार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीत एकूण मतदान 4851 झालं त्यांचं मुल्य 1090300 इतकं आहे. यातील  77 मतं बाद करण्यात आली. राष्ट्रपतीपदाची निवडणुकीच्या बहुमतासाठी 534680 मतांची आवश्यकता होती. कोविंद यांनी   702044 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.

 

COMMENTS