मनसेच्या विरोधी पक्षनेत्यासह 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मनसेच्या विरोधी पक्षनेत्यासह 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

कल्याण -डोंबिवली महापालिकेचे मनसेचे विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंदार हळबे यांनी स्वतःच्या फायद्याकरता 1 कोटी 9 लाख 84 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्श्व इंडस्ट्रीयल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी सोसायटी मेंटेनन्सचे चुकीचे आकडे दाखविले. तसेच बँकेच्या रिसीटमध्ये खाडाखोड करून व सोसायटीच्या आवारात अनधिकृतपणे गाळे बांधून त्यावर टॅक्स वसूल केला. तसेच याबाबतची चुकीची माहिती देत शासनाचा आयकर बुडवून कोट्यवधी रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत शरद जोशी यांनी केडीएमसीतील मनसेचे विद्यमान विरोधी पक्षनेते मंदार हळबे, व्यावसायिक आणि सोसायटीचे चेअरमन मुकुंद इनामदार यांच्यासह सोसायटीचे 12 समिती सदस्य तसेच विकासकाच्या 5  सदस्यांविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

 

 

COMMENTS