मराठा वादळ मुंबापुरीत धडकले, अख्खी मुंबई जाम, थोड्याच वेळात आझाद मैदानाकडे कूच !

मराठा वादळ मुंबापुरीत धडकले, अख्खी मुंबई जाम, थोड्याच वेळात आझाद मैदानाकडे कूच !

मुंबई – आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज एकच चर्चा मराठा मोर्चा आहे. मुंबईकडे येणारे सर्व रस्ते पॅक झाले आहेत. राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या मराठा बांधवांमुळे आझादमैदानाकडे जाणारे रस्त्यांवर मोठं ट्रॅफिक जाम झालं आहे. पुण्याहून येणा-या गाड्या नवी मुंबईत थांबवल्या आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील ट्रेनला प्रचंड गर्दी झाली आहे. सध्या मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून, आजपर्य़ंतच्या इतिहासात सर्वात मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात जिजामाता उद्यानापासून या मोर्चाला सुरूवात होईल. आझाद मैदानाकडे हा मोर्चा जाणार आहे. तिथे मुलींची भाषणे होऊन नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे.

COMMENTS