उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभुतपूर्व यशानंतर गुरूवारी भाजपच्या झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. दलितांशी संपर्क वाढवणे, युवकांना पक्षाशी मोठ्या प्रमाणात जोडणे यावर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांन केलं आहे. 2019 ची लोकसभा निवडणुक हे पक्षासाठी मोठं आव्हान असेल असं पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. या बैठीकला पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाध्यत्र अमित शहा यांच्यासह संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
दलितांना पक्षासोबत जोडण्याची योजना
उत्तर पदेशामध्ये पक्षाला जो मोठा विजय मिळाला आहे. पारंपारिक मतांसोबतच दलित मतेही पक्षाला मोठ्या प्रमाणात मिळाली असल्याचा निष्कर्ष पक्षाच्या अंतर्गत अहवालात काढल्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही दलित मते मिळवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. दलितांसाठी वेगवेगळ्या योजना राबण्यासोबतच त्यांच्याशी संपर्क वाढवण्याच्या सुचनाही कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत. आजपर्यंत पक्षाला दलितांची फारशी मते मिळत नव्हती. त्यामुळे पक्षही दलित मतांवर फारसा अवलंबून राहत नव्हता. मात्र यावेळी पक्षाने केलेल्या सोशल इंजिनिअरींगमुळे ही मते भाजपकडे वळाल्याचा पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमत्त एक आठवढाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक वॉर्डात, जिल्हाच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक गावाच्या ठिकाणी आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर 6 एप्रिलला स्वच्छ भारत अभिनायाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात देशभर राबवला जाणार आहे.
भीम अप आणि डिजीटलच्या माध्यमातून युवकांशी संवाद
भीम अपच्या माध्यमातून दलित आणि इतर युवकांशी जोडण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात येणार आहे. आजकाल तरुण हे टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्याऐवजी मोबाईलवर जास्त सक्रीय असतात. त्यामुळे डिजीटलच्य माध्यमातून युवकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरकारच्या स्वच्छ कारभार, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई, विकासाची कामे ही या माध्यमांद्वारे युवकांपर्यंत पोहवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युवकांमध्ये आणि पहिल्यांदाच मतदान करणा-यांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी क्रझ आहे. गेल्या निवडणुकी अशी नवमतदारांची मते मोठ्या प्रमाणात पक्षाला मिळाली होती. त्याचाच एक भाग म्हणून आता 10 वीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत.
आतापासूनच 2019 ची तयारी सुरू करा – शहांचा आदेश
2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी करण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. मोदी सरकारने नोटबंदीसह विविध लोककल्याणकारी योजनांमुळेच विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचं शहा यांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवा असा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला आहे.
COMMENTS