भाजपची नीतीशकुमार यांना ऑफऱ, आता नीतीशकुमार काय निर्णय घेणार ?

भाजपची नीतीशकुमार यांना ऑफऱ, आता नीतीशकुमार काय निर्णय घेणार ?

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिल्यानंतर आणि गेल्या 20 महिन्यांची जेडीयू आणि राजदची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये काय होणार याकडं देशाचं लक्ष लागलंय. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपनं नीतीशकुमार यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधानांनी नीतीशकुमार यांचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात राजीनामा दिल्यामुळे पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. तसंच भाजप बिहारचे नेते सुशीलकुमार मोदी यांनीही थोड्यावेळापूर्वी राज्यात भाजपा मध्यावधी निवडणुका नको आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपचा कल नीतीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा आहे. मात्र आता नीतीशकुमार काय करणार, भाजपचा पाठिंबा घेणार की मध्यावधी निवडणुकीला तयार होणार हे थोड्याच वेळात समजेल.

COMMENTS