मुंबई – कालपासून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात वंदे मातरम् वरुन जोरदार खडाजंगी सुरू आहे. भाजप शिवसेनेचे नेते इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं सागंत वंदे मातरम् म्हणण्याचा आग्रह धरत आहेत. तर आमच्या नरडीवर सुरी ठेवली तरी आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही अशी भूमिका समाजवादी पार्टी आणि एमआयएमच्या आमदारांनी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाजात अडथळे आले. वंदे मातरम् वरुन सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. एमआयएम आणि भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी हा वाद उकरून काढत असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. देशभक्तीचे ठेकेदार समजणा-या भाजपच्या कोणत्या आमदाराला पूर्ण वंदे मातरम् येतं असा सवालही आव्हाड यांनी केला आहे. केवळ मतांच्या राजकारणाठी भाजप आणि एमआयएमचे नेते नौटंकी करत असल्याची टीका आव्हाड यांनी केलीय.
COMMENTS