भाजप खासदार मनोज तिवारींच्या घरावर हल्ला

भाजप खासदार मनोज तिवारींच्या घरावर हल्ला

दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष, खासदार मनोज तिवारी यांच्या घरावर रविवारी रात्री अज्ञात इसमांनी हल्ला केला असून घरातील काही लोकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

हल्ल्याच्या वेळी मानेज तिवारी घरात नसल्याने बचावले. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे. मनोज तिवारी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. ‘159, नॉर्थ ऍव्हेन्यू रेसिडन्स’ या घरावर हा हल्ला झाला.हल्लेखोरांमध्ये आठ ते नऊ लोक होते. त्यांनी केलेल्या मारहाणीत तिवारी यांच्या घरातील दोन माणसे जखमी झाले आहेत. ‘हा हल्ला म्हणजे कोणीतरी माझ्याविरोधात रचलेला कट आहे आणि पोलिसही त्यांना सामील आहेत’.  असा आरोप तिवारी यांनी केला आहे.

COMMENTS