भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी देशवासियांनी योगदान द्यावे – राष्ट्रपती

भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी देशवासियांनी योगदान द्यावे – राष्ट्रपती

नवी दिल्ली – देशाच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत देशातील सर्व घरांपर्यंत वीज पोहोचायला हवी. याशिवाय चांगले रस्ते, रेल्वेचे जाळे, दळणवळणाच्या सुविधा यांचा वेगाने विकास व्हायला हवा. या प्रक्रियेत देशवासियांनी सक्रीय सहभाग घ्यायला हवा,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी ‘न्यू इंडिया’बद्दल भाष्य केले.

रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना 2022 पर्यंत भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. ‘न्यू इंडियामध्ये गरिबीला कोणतेही स्थान नसेल,’ असेही राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात म्हटले. स्त्री-पुरुष यांच्यातील भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन त्यांनी भाषणाच्या माध्यमातून केले. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोविंद म्हणाले की, देशासाठी  आपल्या जीवाचे बलिदान देणाऱ्या वीर स्वतंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज आहे. आज देशासाठी काहीतरी करण्याच्या भावनेबरोबरच राष्ट्र निर्माणमध्ये स्वत:ला झोकून देणे गरजेचे आहे.

राष्ट्रपती कोविंद यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले, की गांधींजीनी ज्या  सिद्धांतांचे पालन करण्याचे आवाहन केले होते ते तत्व आजही आपल्यासाठी उपयुक्त आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन केले. नेहरूंनी आपल्याला शिकवले की, भारताची परंपरा आधुनिक समाजाच्या निर्माणामध्ये सहायक होऊ शकते. सरदार पटेलने आम्हाला राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे महत्व शिकवले. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या चौकटीत राहून काम करायला व कायद्याच्या राज्याची संकल्पना समजावली.

राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणातील मुद्दे –
# महात्मा गांधींनी समाज आणि राष्ट्राच्या चरित्र निर्माणावर भर दिला. त्यांनी ज्या सिद्धांतांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले ते आजही प्रासंगिक आहेत.

# गांधीजी ऐकटे नव्हेत. त्यांच्याबरोबर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारखे अनेक महापुरुष होते. जेव्हा बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ असे आव्हान केले तेव्हा हजारोंनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

#आपल्याला ज्या पीढीने स्वातंत्र्यता दिली त्यांचे अधिष्ठान व्यापक होते. त्यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचे स्थानही मोठे होते. आज देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान करणाऱ्यांपासून प्रेरणा घेण्याची वेळ आली आहे.

# आपल्या बालपणी मी पाहिलेली गावातीव एक परंपरा मला आजही आठवते. त्यावेळी गावात जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न ठरलेले असते. त्यावेळी गावातील प्रत्येक कुटुंब आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करत होते. त्यावेळी ती संपूर्ण गावाची मुलगी होत असे. प्रत्येक कुटुंब काही ना काही मदत करत होता. जर तुम्ही गरज पडल्यास आपल्य़ा शेजाऱ्यांची मदत कराल तर तेसुद्धा तुमच्या वेळी मदतीला धाऊन येतील.

COMMENTS