देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराविरोधात कितीही मोहिमा राबवल्या तरी भ्रष्टाचार संपण्याचं नाव घेत नाही. नुकत्याच सेंटर फॉर मीडिया स्टडिज या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर असल्याचं आढळून आलं आहे. तर सर्वाधिक भ्रष्टाचार हा कर्नाटकामध्ये होत असल्याचं आढळून आलं आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार हा केरळमध्ये होत असल्याचं आढळून आलं आहे. देशातील 20 राज्यातून 3 हजार लोकांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
कर्नाटकातील 77 टक्के लोकांनी सरकारी पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं आहे. त्याच्यानंतर आंध्रप्रदेशातील 74 टक्के, तामिळनाडू 68 टक्के, महाराष्ट्रातील 57 टक्के, जम्मू काश्मिरमधील 44 टक्के, पंजाबमधील 42 टक्के लोकांना सरकारी कामे करुन घेताना भ्रष्ट्राचार असल्याचं आढळून आलं आहे.
बिहारमधील भ्रष्टाचार कमी झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2005 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात बिहार भ्रष्टाचारात 1 नंवरवर होते. बिहारमधील 74 टक्के लोकांना भ्रष्टाचाराचा अनुभव आला होता. त्या तुलनेत बिरारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाल्याचं आढळून आलं आहे. नोटबंदीनंतर काही प्रमाणात भ्रष्टाचार कमी झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
COMMENTS