मग दुष्काळ पडणार नाही याची सरकार गॅरंटी देणार का ? – धनंजय मुंडे

मग दुष्काळ पडणार नाही याची सरकार गॅरंटी देणार का ? – धनंजय मुंडे

 

मुंबई – शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन विधीमंडळात आजही जोरदार गदारोळ सुरू आहे. गेले आठ दिवस या प्रश्नावरुन विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाच कामकाज होऊ शकलं नाही. काल मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांवर जोरदार टीका केली होती. बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे, शेतक-यांची कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची विरोधक गॅरंटी देणार का ?  असा प्रश्न काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधकांना केला होता. त्याचा आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार समाचार घेतला. सरकार दुष्काळ पडणार नाही याची गॅरंटी देणार का ?  असा प्रश्न करत सरकार दुष्काळ पडणार नाही याची सरकार गॅरंटी देणार असेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. काल गारपीठ झाली ती मुख्यमंत्र्यांनी का थांबवली नाही असाही सवाल मुंडे यांनी केला….

दरम्यान आजही कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे शिवसेनेचे मंत्री कर्जमाफीच्या मुद्यावर आज मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत, तर दुसरीकडे आमदारांनी मात्र विधीमंडळात विरोधकांच्या सुरात सुर मिळवत कर्जमुक्तीच्या घोषणा दिल्या. शेतक-यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणांनी सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.

COMMENTS