मत्स्यफेक प्रकरणी नितेश राणेंना अटक

मत्स्यफेक प्रकरणी नितेश राणेंना अटक

मत्स्यफेक प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना थोडयाच वेळात सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते.

नितेश राणे हे मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी जिल्हा कार्यालयात येथे गेले होते. आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली फेकली. तुम्ही तुमची कामे नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथे यावे लागले, असे सुनावत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले होते.

COMMENTS