मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी !

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी !

मुंबई – मनसेतून  शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी नगरसेकांच्या घरांना आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिले आहे.

मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ  91 वर पोहोचले आहे. याशिवाय शिवसेनेला तीन अपक्षांचे समर्थन आहे. सत्तेच्या दिशेने भाजपा एक-एक पाऊल टाकत असताना शिवसेनेने षटकार लगावला. शिवसेनेच्या या खेळीची कुणकुण लागल्याने भाजपाने विभागीय कोकण आयुक्तांच्या कार्यालयातील नोंदणी अधिका-यालाच मंत्रालयातून बोलावणे धाडले. नोंदणीला विलंब करण्यासाठी हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र शिवसेनेनेही नोंदणीसाठी आधीच जोरदार फिल्डिंग लावल्याने भाजपाचा प्रयत्न फसला आहे.

COMMENTS