मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई झालीय सज्ज

मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई झालीय सज्ज

मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबई सज्ज झाली असून दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शीव (सायन) ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. डबेवालेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने पोलिस या सगळ्यावर लक्ष ठेवणार आहेत. सुमारे 7 हजार पोलिस यासाठी तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने यासाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पिण्याच्या पाण्याचीही सर्वत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 7 ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स, 8 ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर, 6 ठिकाणी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 पाहुयात कशी व्यवस्था केलीय महापलिकेने
मोबाईल टॉयलेट्स
F/N वॉर्ड – प्रतीक्षा नगर जवळ – 2
F/N वॉर्ड – जे. के. केमिकल्स नाला जवळ – 3
F/S वॉर्ड- बीपीटी एरिया, सिमेंट यार्ड – 4
E वॉर्ड – ई एस पलटनवाला मार्ग – 2
E वॉर्ड – tume high-school जवळ – 1
A वॉर्ड – हज हाऊस जवळ – 1
A वॉर्ड – आझाद मैदान – 2
——————————
पाण्याचे टँकर
F / N वॉर्ड – वसंतदादा पाटील college जवळ – 2
F/S – बीपीटी एरिया, सिमेंट यार्ड – 4
E / वॉर्ड – राणी बागेजवळ – 1
A वॉर्ड – आझाद मैदान – 1
——————————
मेडिकल टीम
प्रियदर्शिनी नाका जवळ – 10 पुरुष डॉक्टर आणि 10 महिला डॉक्टर
जिजामाता उद्यानाजवळ – 10 पुरुष डॉक्टर आणि 10 महिला डॉक्टर
जे जे उड्डाण पूल – 10 पुरुष डॉक्टर आणि 10 महिला डॉक्टर
C S T जवळ – 10 पुरुष डॉक्टर आणि 10 महिला डॉक्टर
आझाद मैदान – 10 पुरुष डॉक्टर आणि 10 महिला डॉक्टर
बीपीटी सिमेंट यार्ड – 5 पुरुष डॉक्टर आणि 5 महिला डॉक्टर

 

 

COMMENTS