मराठा गोलमेज परिषदेत 17 ठराव मंजूर, अर्धनग्न मोर्चे रद्द

मराठा गोलमेज परिषदेत 17 ठराव मंजूर, अर्धनग्न मोर्चे रद्द

कोल्हापूर – मराठा समाजाच्या कोल्हापूरात घेण्यात आलेल्या सकल मराठा गोलमेज परिषदेत महत्वपूर्ण असे 17 ठराव मांडण्यात आले. या परिषदेला राज्यातून मराठा समाजातील 400 प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा समाजाचे गेल्या सहा महिन्यात विराट मोर्चे निघाल्यानंतर गोलमेज परिषदेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे या परिषदेमध्ये मराठा समाजासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यापूर्वी नेतृत्व नसल्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरु होती. त्यावर आता हा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी अर्धनग्न मोर्चाही आयोजित करण्यात आला होता, ते सगळे मोर्चे आता रद्द करण्याचा निर्णय या गोलमेज परिषदेत घेण्यात आला.

या परिषदेमध्ये जवळपास 17 ठराव समंत करण्यात आलेत. त्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, बेळगावसह सीमाभागातील मराठा बांधवांच्या पाठीशी उभं राहणं, या ठरावांचा समावेश आहे.

 

COMMENTS