मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 10 मे रोजी पुण्यात मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा अर्धनग्न मोर्चा असणार आहे. 10 मे रोजी पुण्यात, तर 30 मे रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत आझाद मैदान ते मंत्रालय असे मोर्चाचे स्वरुप असणार आहे. प्राध्यापक संभाजी पाटील यांनी पुण्यात याबाबत माहिती दिली. यावेळी प्राध्यापक संभाजी पाटील यांच्यासोबत मराठा समाजाचे इतर कोणतेही नेते नव्हते. त्यामुळे पुण्यातील अर्धनग्न मोर्चाला मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजकांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.
कोल्हापुरात सकल मराठा समाजाची दुसरी गोलमेज परिषद 19 एप्रिलला होणार आहे. 400 हून अधिक लोक यात सहभागी होणार असून, समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी 25 जणांची कमिटी परिषदेत ठरवण्यात येणार आहे. कोल्हापुरातील मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण नारायण राणे यांना देण्यात आले नाही.
COMMENTS