मराठा समाजाचे प्रतिनिधी, आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट !

मराठा समाजाचे प्रतिनिधी, आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाचा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी मराठा समाजाचे मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि आमदार गुरूवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत विधिमंडळात मोर्चाबाबत आणि मराठा समाजाचे प्रश्न मांडणे, सर्वपक्षीय मराठा आमदारांची समन्वय समिती स्थापन करणे,  आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न आणि क्रांती मोर्चाची तयारी यावर चर्चा करण्यात आली.  यानंतर या सर्व मुद्दयांवर मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS