बसपाच्या प्रमुख मायावती यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची इशारा दिली आहे. ‘मला राज्यसभेत माझ्या मुद्द्यावर बोलू द्या नाहीतर मी राजीनामा देईन’, असा इशारा मायावती यांनी राज्यसभेत दिला.
मायावती यांनी दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. मायावती यांनी सहारनपुरमध्ये झालेल्या हिंसेचा संदर्भ देत आपला मुद्दा मांडला. हा प्रकार भाजपने जाणिवपूर्वक घडवून आणल्याचा आरोप मायावती यांनी राज्यसभेत केला. तसेच मायावती यांनी या संदर्भातील स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण या प्रस्तावावर बोलायला मायावती यांना राज्यसभेत फक्त तीन मिनीटांची वेळ देण्यात आला. प्रस्तावावर बोलत असताना सभापतींनी वेळ संपल्यामुळे मायावती यांना थांबायला सांगितले. मी ज्या समाजाचे प्रतिनिधीत्त्व करते त्या समाजाबद्दलच्या गंभीर बाबी मला सभेत मांडू दिल्या जात नसल्याने आपल्या पदाचा उपयोग काय? असे म्हणत मायावतींनी राजीनामा देण्याची धमकी दिली. मुद्दामून आपल्याला या मुद्द्यावर बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत संतापलेल्या मायावती यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS