राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज योगनेअंतर्गत शेतकऱ्याचे कर्जमाफ करण्यात आले आहे. मुंबई 694 आणि मुंबई उपनगरे 119 असे एकून 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं वाचून-ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईत एवढे शेतकरी आले कुठून?, ते पूर्णवेळ शेतकरी आहेत की त्यांचे अन्यही व्यवसाय आहेत? त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला होता. मी तसं अधिकार्यांना विचारलंही. मात्र चौकशी करुनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
विशेष म्हणजे मुंबई उपनगरापेक्षा मुंबईतील शेतकरी जास्त असल्याने या यादीवर सोशल मीडियावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुंबईत शेतीसाठी फारशी जागा उपलब्ध नाही. मग नेमके लाभार्थी कोण असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच आता प्रसिद्ध करावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
मुंबई मधे कर्ज माफी कशी काय?मंत्रालायाच्या गच्चीवर शेती केली जात आहे वाटते?
— shripad mohole (@MoholeShripad) July 4, 2017
सर्व नाव वाचली एक नाव जरा खटकलं ते म्हणजे मुंबई शहर मुंबईत शहरात फक्त रेल्वे च्या थोड्या जागेत भाजीपाला पिकवला जातो त्यांचं कर्ज आहे का
— शेखर सुधाकर दामले. (@shekhar_damle) July 3, 2017
मुंबई ११९?; कुठले रेल्वे ट्रॅक वरचे ?
— Yatin Thakur ???????? (@ThakurY) July 3, 2017
COMMENTS