सदाभाऊ खोत यांची चौकशी समितीच्या बैठकीला दांडी

सदाभाऊ खोत यांची चौकशी समितीच्या बैठकीला दांडी

पुणे – राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. सदाभाऊ खोत यांनी समितीच्या बैठकीला आज दांडी मारली आहे. त्यामुळे आता 21 जुलै रोजी होणा-या समितीच्या बैठकीला सदाभाऊ आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य आणि समितीचे प्रमुख दशरथ सावंत यांनी दिला आहे.

दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर सदाभाऊ खोत यांनी 4  जुलैला समिती समोर जाऊन बाजू मांडावी असा निर्णय घेण्यात आला. मात्र आज पुण्यात होणाऱ्या बैठकीला सदाभाऊंनी पाठ फिरवत मी एकादशीनिमित्त पंढपुरला आलो असून मला बैठकीला येणे अशक्य आहे. त्यामुळे ही बैठक पुढे घ्यावी अशी विनंती खोत यांनी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांच्याकडे केली आहे. आता ही बैठक 21 तारखेला पुण्यात होणार असून त्यापूर्वीच सदाभाऊ 26 प्रश्न पाठवण्यात आले आहेत. त्याचे लेखी उत्तर आणि चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून 21 तारखेच्या बैठकीला न आल्यास सदाभाऊंवर कारवाई होणारच असा इशारा देखील सावंत यांनी यावेळी दिला.

COMMENTS