मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे 14 सप्टेंबरला भूमिपूजन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे 14 सप्टेंबरला भूमिपूजन

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचे भूमिपूजन येत्या 14 सप्टेंबर रोजी जपानचे पंतप्रधान अॅबे शिंजो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साबरमती येथे होणार आहे.

या बुलेट ट्रेन मार्गाच्या उभारणीचे काम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे; मात्र सरकारकडून हे काम 2022 पर्यंतच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बुलेट ट्रेनचे तिकीटाचे दर अजुन ठरविण्यात आलेले नाहीत.

मुंबई-अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान एकूण 12 स्थानके राहणार असून प्रत्येक स्थानकावर ही ट्रेन फक्त 165 सेकंद थांबणार आहे. या प्रकल्पात 12 ते 15 लाख लोकांकडून नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की या हाय स्पीड प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

COMMENTS