मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड राजकारणाच्या आखाड्यात ?

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड राजकारणाच्या आखाड्यात ?

 

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टर माईंड आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफीज सईद आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यानं पक्ष स्थापनेसाठी पाकिस्तानच्या निवडणुक आयोगाकडे अर्ज केला आहे. त्याची दहशतवादी संघटना जमात-उद- दावा चं नाव बदलून मिली मुस्लिम लिग असं त्यानं त्याच्या संभाव्य पक्षाला नाव दिलं आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड अस्थिरता आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दावरुन नवाज शरीफ यांना पायउतार व्हावं लागलं आहे. शरीफ यांचा कट्टर विरोध इम्रान खानही सध्या अडचणीत आला आहे. त्याच्याच एका सहकारी खासदाराने त्यांच्यावर  गंभीर आरोप केलेत. इम्रान खानने आपल्याला अश्लिल मेसेज केले असा त्या महिला खासदराचा आरोप आहे. त्यामुळे इम्रान खानही काहीसा बॅकफूटवर गेला आहे. याचाच फायदा घेण्याचा हाफीज सईदचा प्रय़त्न आहे.

हाफीजला दहशतवादी जाहीर करावे यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सईद पाकिस्तानमध्ये नजरकैदेत आहे.  त्यातून बाहेर येण्यासाठी आणि त्याला राजकारणात उतरायचं आहे.

COMMENTS