कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखल करायलाच 90 दिवस लावले, मग शिक्षा कधी होणार ? – सुप्रिया सुळे

कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखल करायलाच 90 दिवस लावले, मग शिक्षा कधी होणार ? – सुप्रिया सुळे

पुणे – राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूण होत आहे. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. तसेच अरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहे. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला.  खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ते विधान भवना पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात निकाल लावू अस आश्वासन दिलं होतं मात्र कोपर्डी घटनेत चार्टशीट दाखल व्हायला नव्वद दिवस लागले. कोपर्डी घटनेतील पीडीत मुलीच स्मारकाचे राजकारण नको. स्मारक व्हावं की नाही हा कुटुंबीयाचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री असणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मध्येच जास्त असतात, त्यांच्या हेलिकॉप्टरच्याच बातम्या जास्त येतात. असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी लागावला.

13 जुलै 2016 रोजी घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. लोकांच्या संतापानतर या घटनेतील आरोपींना अटक झाली. त्यानंतर सरकारने वर्षभरात हा खटला निकाली काढण्यात आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या गुह्यातील आरोपींना शिक्षा झाली नाही. अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातीलल कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भावाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

 

पाहा  व्हिडिओ –

 

COMMENTS