पुन्हा एकदा सायबर हल्ल्याने तोंड वर काढले आहे. पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने युरोपसह जगभरातील देशांना लक्ष्य केले. भारतालाही या हल्ल्याची झळ बसली असून जेएनपीटी येथील कामकाज ठप्प पडल्याचे वृत्त आहे.
हा व्हायरस ‘पीटा’ नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली आहे.
या हल्ल्यांने आता थेट बँका, कंपन्या आणि सरकारेच निशान्यावर घेतली आहेत. याचा सर्वाधिक परिणाम युरोपवर झाला आहे. यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी देशातील पॉवर ग्रिड तसेच बँका आणि कंप्यूटर्सवर मोठे अतिक्रमण झाल्याचे म्हटले आहे. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातलाच, शिवाय बँका तसंच इतर कंपन्यांसह ब्रिटीश सरकारचं मंत्रालयही बंद करण्यात आलं आहे.
COMMENTS