राज्यातल्या काँग्रेसच्या बड्या, हायप्रोफाईल नेत्यावर बलात्काराचा गुन्हा !

राज्यातल्या काँग्रेसच्या बड्या, हायप्रोफाईल नेत्यावर बलात्काराचा गुन्हा !

पुणे – राष्ट्रीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि राहुल गांधी ब्रिगेडचे समजले जाणारे रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार महिनेने केली होती. त्या तक्रारीवरुन काल रात्री उशीरा विश्रामबाग वाडा पोलीस स्टेशनमध्ये रोहित टिळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पणतू, विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांचे नातू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दिपक टिळक यांचा मुलगा आहेत. पुण्यातील काँग्रेसचा प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या रोहित यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे.

COMMENTS