राणे – शहा चर्चा तर झाली, पण पुढे काय ?

राणे – शहा चर्चा तर झाली, पण पुढे काय ?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र या चर्चेतून राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा निर्णय झाला नाही. राणे – शाह यांच्या चर्चेत नेमके काय मुद्दे होते किंवा राणेंनी काय अटी ठेवल्या होत्या किंवा भाजपने काय  अटी ठेवल्या याची माहिती समोर आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांनी स्वतःसाठी राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान, नितेश यांना विधानसभा आणि निलेश यांना लोकसभा मतदारसंघातून लवढण्याची हमी मागितल्याची माहिती आहे. भाजपने सध्यातरी या मागण्या मान्य केल्या नाहीत अशी माहिती आहे.

राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न देता त्यांना त्यांचा वेगळा पक्ष काढू द्यावा आणि तो पक्ष एनडीएमध्ये यावा अशीही रणनिती असल्याचं पुढं येतंय. राणेंना थेट पक्षात प्रवेश दिल्याने वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यापेक्षा त्यांना वेगळा पक्ष काढायला लावून त्याला सोबत घेणे भाजपला सोईस्कर वाटत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा आरक्षण, शेतक-यांची नाराजी यावर उपाय म्हणून राणे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांना पुढं केलं जाऊ शकतं. तसंच एनडीएचा घटक पक्ष म्हणून राणेंची मंत्रीमडळात वर्णी लागू शकते. भाजप आणि राणे आपआपल्या सोईप्रमाणे निर्णय घेणार असले तरी जनता त्यांच्या या सोईच्या राजकारणात किती साथ देते ते पहावं लागेल.

COMMENTS