रामदास आठवले बिबट्याचे पालक !

रामदास आठवले बिबट्याचे पालक !

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका बिबट्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली 6 वर्षं असलेल्या भीम या बिबट्याला पालक मिळाले आहे. आज नॅशनल पार्क मध्ये जाऊन त्यांनी त्याबाबतची सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण केलीय. तसेच बिबट्या भीमची  त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पाहाणीही केली. सहा वर्षांपूर्वी बिबट्याचे दोन बछडे शहापूर येथे पुराच्या पाण्यात वाहून जात असताना नॅशनल पार्कच्या वन्य जीवरक्षक अधिकाऱयांनी वाचवले होते. त्यावेळी त्यांचं ‘भीम’ आणि ‘अर्जुन’असं नामकरण करण्यात आलं होते. गेली सहा वर्षं ते नॅशनल पार्क मधील रेस्क्यू सेन्टरमध्ये आहेत. डिसेंम्बर 2013 ला शासनाने सुरु केलेल्या वन्य प्राणी दत्तक योजनेनुसार तीन वर्षांपूर्वी ‘अर्जुन’ला पालक मिळाले होते. ठाण्याच्या साधना माने यांनी ‘अर्जुन’चं पालकत्व घेतलं होते. भीम अजूनही पालकांच्या प्रतिक्षेत होता. या योजनेअंतर्गत इथून पुढे या बिबट्याच्या देखभालीचा संपूर्ण खर्च आठवले उचलणार आहेत. तर महिन्यातून काही दिवस आठवले आणि त्यांच्या कुटुंबाला भीमला जवळून पाहाता येईल.

COMMENTS