शेतकऱ्यांची विल्हेवाट लावून विकास करणे आमची भुमिका नाही – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांची विल्हेवाट लावून विकास करणे आमची भुमिका नाही – उद्धव ठाकरे

 मुंबई – शेतकऱ्यांची विल्हेवाट लावून विकास करणे ही आमची भुमिका नाही, जो पर्यंत शेतकरी समाधानी होत नाही तो तोवर आम्ही समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध असेल. समृद्धी महामार्ग झाला पाहिजे हे सरकारचे धोरण आम्हाला मान्य आहे. कोणत्याही परिस्थित शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाता कामा नये आणि त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत असेल तरच आम्ही या महामार्गाच्या आड येणार नाही हे वचन देतो आहे असे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार (दि.15) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका या खोट्या बातम्या आहेत. पक्ष प्रमुखांच्या आदेशानेच मी काम करतोय. पक्ष आणि पक्ष प्रमुखांन पुढे मंत्री पद मोठं नाही. कुठल्याही शेतकऱ्यावर बळ जबरी केली गेलेली नाही स्वतःहून शेतकऱ्यांनी त्याच्या इछेने खरेदी खतावर सह्या केल्या आहेत. विरोधकांना राजकाऱण करायचंय तर शिवसेनेला विकास करायचा आहे.’ असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे

शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही

शिवसेना आणि मंत्र्यांची भूमिका वेगळी नाही

जिथे जमीनी देणं अशक्य आहे, तिथे आम्ही विरोध करणारच, त्या शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतो

शेतकऱ्यांना दिलासा देऊन, त्यांच्यासोबत राहून आम्ही विकास काम करतोय

सुधारित प्रस्ताव जो असेल तो आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत

विकास करताना आपलं स्वप्न पूर्ण करताना त्यांच्या स्वप्नांचा चुरडा करायचा नाही

ज्या सुपिक जमीनी जात असतील तर तिथे जुन्या मार्गाला मोठा करण्याचा आमचा विचार आहे, तेच एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे

जी शेतकऱ्यांची भूमिका ती शिवसेनेची भूमिका हे स्पष्ट करतो

जो मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो आहे त्यांना तो पटतोय का ते तुम्ही त्यांना विचारा

शिवसेनेने भूमिका बदलेली नाही, केवळ शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना आम्ही तिथे पाठवले आहे

शेवटच्या शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतरच आम्ही खरेदी खतावर सही करतो

आमचा प्रकल्पाला विरोध नाही, जोरजबरदस्तीला विरोध आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आम्ही सरकारला भूमिका घेऊ देणार नाही

मी शेतकऱ्यांशी चर्चा करून आलो, अनेक ठिकाणी सुपीक जमीन मागितली जात आहेत

COMMENTS