“सोनिया गांधींनी हाकलून देऊनही तुम्ही लगेच त्यांच्यासोबत कसे गेलात ?”

“सोनिया गांधींनी हाकलून देऊनही तुम्ही लगेच त्यांच्यासोबत कसे गेलात ?”

सांगली – सत्तेत सहभागी राहुन मित्र पक्षावर वार करणारं उदाहरण आपण राजकीय आयुष्यात पाहिलं नाही या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका पक्षात राहून आपल्या सहका-याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मी माझ्या राजकीय आयुष्यात कधी पाहिलं नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचा पाय सत्तेच्या फेवीकॉलमध्ये अडकला आहे. त्यामुळे शिवसेनेचा कितीही अपमान झाला तरी ते सत्तेतून बाहेर पडत नाहीत अशीही टीका शरद पवार यांनी केली होती. त्यालालही उद्धव यांनी प्रत्युतर दिलं आहे.  ज्या सोनिया गांधी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं. त्यांच्यासोबत तुम्ही लगेच कसे काय गेलात ? याचं उत्तर आधी द्या आणि नंतर आमच्यावर बोला असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे. 15 वर्ष तुम्ही भांडी घासली ना? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS