विधानसभेत मंत्र्यांची आमदारांना ठार मारण्याची धमकी

विधानसभेत मंत्र्यांची आमदारांना ठार मारण्याची धमकी

जम्मू-काश्मीर विधानसभेत जीएटीवरील चर्चेदरम्यान राज्यातील मंत्र्यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांना विधानसभेतच चक्क ठार मारण्याची धमकी दिली.

जम्मू -काश्मीर राज्यात अद्याप जीएसटी लागू झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेत काल जीएसटीवर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान राज्यातील मंत्री इमरान अन्सारी यांना राग अनावर झाला. त्यांनी विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार देवेंद्र राणा यांना जमावाकडून ठार मारण्याची धमकी दिली. जीएसटीवरील चर्चेदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त वाद झाला.

आमदार राणा यांनी  राज्य आणि राज्यातील जनतेसाठी काय योग्य आहे, काय नाही, यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, असं आवाहन केलं. जीएसटीमुळे राज्याचा विशेष दर्जा डळमळीत होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत त्यांनी जीएसटीला विरोध दर्शवला. त्यावेळी मंत्री अन्सारी यांनी राणा यांनी भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले. राणा हे जीएसटीला विरोध करत आहेत. त्यांनी आधीच आपल्या सर्व उद्योगांची जीएसटी अंतर्गत नोंदणी केलेली आहे. राणा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उद्योगांच्या नोंदणी क्रमांकाबाबतचा मुद्दाही त्यांनी छेडला. त्यावर आपण करचोरी केलेली नाही, असे उत्तर राणा यांनी दिले. यानंतर मात्र इमरान अन्सारी यांचा पारा चढला आणि त्यांनी राणा यांना थेट विधानसभेतच जीवे मारण्याची धमकी दिली. तुमच्या सर्व अनधिकृत उद्योगांची मला माहिती आहे. तुमच्यापेक्षा मोठा चोर कुणी असूच शकत नाही. इतका पैसा तुमच्याकडे आला कुठून असा सवाल करत विधानसभेतच तुम्हाला ठार मारू शकतो, अशी धमकी दिली. यावेळी राणा म्हणाले की, ‘जम्मू काश्मीरच्या हित आणि सुरक्षेसाठी माझ्यासारखे कित्येक जण जीव द्यायला तयार आहेत’.

COMMENTS