विविध वस्तूंवर जीएसटी लागू, काय स्वस्त होणार काय महाग होणार ?

विविध वस्तूंवर जीएसटी लागू, काय स्वस्त होणार काय महाग होणार ?

दिल्लीत आज जीएसटीबाबत झालेल्या बैठकीत विविध वस्तूंवर कर जाहीर करण्यात आले. सोन्यावर तीन टक्के कर लावण्यात आला आहे. यापूर्वी सोन्यावर 2 ते  अडीच टक्के कर होता. त्यामध्ये अर्धा ते एक टक्के कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. महागड्या चप्पल आणि बुटांवरही मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आला आहे. 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चप्पल आणि बुटांवर यापुढे तब्बल 18 टक्के कर लागणार आहे. त्यामुळे ब्रँडेड चप्पल आणि बूट मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता आहे. 500 पेक्षा कमी किंमत असलेल्या चप्पल आणि बुटांवर मात्र फक्त 5 टक्के कर लावण्यात येणार आहे. तयार कपड्यांवर १२ टक्क्यांपर्यंत कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या ब्रँडेड बिस्किटांवर मात्र १८ टक्के कर लावला जाणार आहे. सध्या स्वस्त बिस्किटांवर २०.६ टक्के इतका कर लावण्यात येत आहे. त्यामुळे बिस्टीक काही प्रमाणात स्वस्त होणार आहेत. विडीवर सिगारेटप्रमाणेच २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. विडीवर सध्या २० टक्के कर आहे.
सिल्क आणि जूटवर काहीही कर लागणार नाही. कॉटन आणि नैसर्गिक फायबरवर ५ टक्के, तर बनवलेल्या फायबरवर १८ टक्के कर लावण्यात येणार आहे. धाग्यावर ५ टक्के, बनवलेल्या धाग्यावर १८ टक्के कर लागणार आहे. सर्व प्रकारच्या विणलेल्या कापडावर ५ टक्के कर लावण्यात येणार आहे. १००० रुपयांहून कमी किंमतीच्या कपड्यांवर ५ टक्के कर लागणार आहे.

COMMENTS