सांगली – शिराळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ

सांगली – शिराळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ

सांगली – शिराळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने 11 जागा जिंकत स्पष्ट विजय मिळविला. तर भाजपला 6 जागांवर विजय मिळला आहे. शिराळा नगरपंचायतीत  17 प्रभागांसाठी 56 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 86.57 टक्के मतदान झाले होते. नागपंचमी पूजा आणि शहराचा विकास या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली होती.

COMMENTS