शिवसेनेच्या आमदाराची शेतकऱ्याला धमकी

शिवसेनेच्या आमदाराची शेतकऱ्याला धमकी

सोलापूर -शिवसेनेच्या करमाळ्याच्या आमदार नारायण पाटील यांनी रोहिदास कांबळे या शेतकऱ्यास तूला टांगून मारेन असे धमकी दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध करमाळा तालुक्यातील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रोहिदास कांबळे नामक शेतकऱ्याला तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन, अशी धमकी शिवसेनेच्या आमदाराने दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यावर हा आरोप केला आहे. या प्रकरणी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करुन सुरक्षेची मागणी केली आहे.

गृहमंत्रालय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने ते कोणती कार्यवाही करतील हे पाहायचे आहे असा सूर शेतकरी वर्गात उमटत आहेत

आपल्या समर्थकांच्या विरोधातील पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी आपल्याला धकमी दिली, असा आरोप शेतकरी रोहिदास कांबळे यांनी केला आहे.

“तुला बांधून आणून उलटं टांगून मारेन आणि तुला कोणी सोडवायला येईल ते बघू. तुझं जगणं मुश्किल करेन”, अशी धमकी दिल्याची तक्रार शेतकरी रोहिदास कांबळे यांनी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल  केली आहे.

आमदार नारायण पाटील यांनी मोबाईल संभाषणातील आवाज आपलाच असल्याचं मान्य केलं आहे. मात्र, शेतकऱ्याला धमकाविण्याचा उद्देश चांगला असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, आमदार नारायण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बसपाच्या शिष्टमंडळाने सोलापूर ग्रामीण पोलिसांना निवेदन दिलं आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व कायदा युती सरकारकडून टांगणीला बांधला आहे. हे सरकार आल्यावर गृह खाते निष्क्रीय कारभारावर सर्व स्तरातून निषेध नोंदवित आहेत.

 

COMMENTS