शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मराठा समाजाचे प्रमाण अधिक !

शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मराठा समाजाचे प्रमाण अधिक !

मुंबई –  शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मराठा समाजाचे प्रमाण अधिक असल्याच माहिती समोर आले आहे.  गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यां पैकी 26 टक्के शेतकरी मराठा होते अशी माहिती समोर आली आहे. एप्रिल 2014 ते मार्च 2016 दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात एकूण 3880 शेतक-यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या शेतक-यांमधील 26 टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 53 टक्के मराठा समाजातील शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या रिसर्च स्टडीमधून ही माहिती समोर आली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याच्याआधारे ही आकडेवारी समोर आली आहे. स्वयंसेवकांनी आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट दिली. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली, आणि त्यानंतरच ही माहिती दिली गेली.

 

COMMENTS