संयुक्त महाराष्ट्रसाठी लढणा-या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

संयुक्त महाराष्ट्रसाठी लढणा-या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली.. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. आज अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करण्यात आला, विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले होते.

संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर,मुख्य सचिव सुमीत मल्लिक, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

 

COMMENTS