सचिन तेंडुलकरने का घेतली पंतप्रधानाची भेट ?

सचिन तेंडुलकरने का घेतली पंतप्रधानाची भेट ?

 सचिन तेंडुलकरने आज राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सचिनचा आगामी ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या  चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे.  ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट मास्टरब्लास्टरने केलं आहे.

COMMENTS