सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टीवर जोरदार प्रहार

सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टीवर जोरदार प्रहार

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याच शीत युद्ध सुरु आहे. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केले होते , मात्र  आता सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. 

राजू शेट्टींनी आपल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा. अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी काम करत नाही. मी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितलं.

तसेच  मी आत्मक्लेश यात्रेपासून लांब राहावं असं राजू शेट्टी यांना वाटत असेल तर हरकत नाही. मी मळलेल्या वाटेवरुन चालणार कार्यकर्ता नाही. सदाभाऊ स्वतःची वाट स्वतः निर्माण करतो.’  असं म्हणत सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना उत्तर दिलं आहे.

COMMENTS