‘त्या’ विधानाबाबत रामदेव बाबा यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

‘त्या’ विधानाबाबत रामदेव बाबा यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

‘भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात यावा,’ असे विधान मागील वर्षी रामदेव बाबा यांनी केले होते. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेव बाबा यांना समन्स बजावले होते.

हरियाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुभाष बत्रा यांच्या तक्रारीवरुन रामदेव बाबांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ‘भारत माता की जय’ घोषणेवरुन केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबा यांच्याविरोधात हरयाणा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  याप्रकरणी 14 जुनला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश रामदेव बाबा यांना दिले आहेत.

 

COMMENTS