सरकावरची टीका थांबवा, अन्यथा आमचा मार्ग मोकळा, शाहंचा शिवसेनेला दम ?

सरकावरची टीका थांबवा, अन्यथा आमचा मार्ग मोकळा, शाहंचा शिवसेनेला दम ?

मुंबई – भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काल मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रपतीपादसाठी शिवसेनेनं भाजप ठरवेल त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. मात्र उमेदवार सांगा, त्यानंतरच पाठिंब्याबात सांगू अशी शिवसेनेनं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र याच बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिल्याचंही कळतंय. शिवसेनेचे नेते सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ही टीका तातडीनं थांबवा अन्यथा आमचा मार्ग मोकळा आहे अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला ठणकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रपती उमेदवाराबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमत भूमिका जाहीर करतील अशी शक्यता आहे.

COMMENTS