सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोदी सरकारला चपराक – राहुल गांधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोदी सरकारला चपराक – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिगत गोपनीयतेवर (राईट टू प्रायव्हसी)दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून दडपशाही लादणाऱ्या शक्तींना न्यायालयाच्या निकालाने चांगलीच चपराक बसली असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींवर गांधींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून अनेक योजनांसाठी आधार कार्डची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठा धक्का बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय दिला असून आपण न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत आहोत. व्यक्तिगत गोपनीयता नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग असून नागरिकांवर पाळत ठेवून दडपशाही करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हा जोरदार धक्का असल्याचे ट्विट करत राहुल गांधींनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले.

 

COMMENTS