सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरल्यास ऍट्रॉसिटीचा गुन्हा

सोशल मीडियावर जातिवाचक शब्द वापरल्यास ऍट्रॉसिटीचा गुन्हा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा जातिवाचक शब्दांचाही वापर होताना दिसतो. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टाने  अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातींना उद्देशून कोणताही जातिवाचक शब्द वापरल्यास तो शिक्षेस पात्र गुन्हे ठरेल.

एक महत्त्वच्या खटल्यास सुनावणीदरम्यान दिल्ली  उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातींमधील कुणाही व्यक्तीबद्दल जातिवाचक शब्द वापरल्यास दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई केली जाईल. दिल्ली हायकोर्टाने फेसबुकशी संबंधित खटल्यास हे स्पष्ट केले असले, तरी व्हॉट्सऍप, ट्विटरसारख्या सर्वच सोशल मीडियांना हे लागू असेल.

दिल्ली उच्च न्यायालयाने यासंबंधी फेसबुकचे उदाहरण दिले. न्यायमूर्ती विपीन संघी म्हणाले, फेसबुकवर जेव्हा कुणी प्रायव्हसी सेटिंग प्रायव्हेट न ठेवता, पब्लिक करतो, त्यावेळी त्याच्या वॉलवर कुणीही लिहू शकतो. अगदी त्याच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये नसलेले मित्रही. मात्र, सेटिंग प्रायव्हेट केल्यानंतरी स्वत:च्या वॉलवर जातिवाचक शब्द वापरल्यासही शिक्षेस पात्र असणार आहे.

COMMENTS