4 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

4 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

यावर्षी महाराष्ट्रात दोन ते चार जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार असून यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस होण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.

मान्सून कालावधीत एलनिनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडतील. याशिवाय विदर्भ व मराठवाड्यातील पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड असे हवामान राहील. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदल्याने मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुणे विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची सरासरी 566 टक्के आहे तर 594 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशातील पुढा-यांपासून ते देशाचे धोरण आखणारे, शेतकरी, अर्थतज्ज्ञ याच्यासह शेअर बाजारातील व्यापारीही मान्सूनच्या अंदाजाकडे डोळे लावून बसले असतात. या अंदाजानंतर सर्वांना काहिसा दिलासा मिळेल.

 

 

 

COMMENTS