संघाचे नेते हेच महापुरुष, गांधी, नेहरु नव्हे, भाजपचे विद्यार्थ्यांना धडे !

संघाचे नेते हेच महापुरुष, गांधी, नेहरु नव्हे, भाजपचे विद्यार्थ्यांना धडे !

गांधी, नेहरु नव्हे तर संघाचे नेते हेच महापुरुष असे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहे. दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात भाजपकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. भाजपकडून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी भाजपकडून पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे.

 

विद्यार्थ्यांचे ‘सामान्य ज्ञान’ तपासण्यासाठी परीक्षेचे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी 70 पानांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ही पुस्तिका उत्तर प्रदेशातील लाखो मुलांना देण्यात आली असून यामधील प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. मात्र या पुस्तिकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय संघाच्या अनेक नेत्यांचा उल्लेख यामध्ये महापुरुष म्हणून करण्यात आला आहे. मात्र पंडित जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधींचा उल्लेख करताना ‘महापुरुष’ या शब्दाचा वापर टाळण्यात आला आहे. या पुस्तिकेमध्ये वीर सावरकर, दिनदयाळ उपाध्याय, के. बी. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख आणि संघाच्या इतर नेत्यांची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रवाद, हिंदुत्व यांबद्दलची माहितीदेखील या पुस्तिकेमध्ये आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेखदेखील यामध्ये आहे.  स्वामी विवेकानंद यांनी 1893 च्या शिकागोमधील जागतिक धर्म संमेलनात ‘हिंदुत्वाचे’ प्रतिनिधीत्व केले होते, असा उल्लेख यात पुस्तिकेत छापण्यात आला आहे. याशिवाय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा उल्लेख यामध्ये ‘महापुरुष’ म्हणून करण्यात आला आहे. मात्र जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांच्यासाठी ‘महापुरुष’ हा शब्द वापरण्यात आलेला नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तिकेतील माहितीवरुनच विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.

COMMENTS