प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, विरोधक आक्रमक

प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, विरोधक आक्रमक

एसआरए घोटाळ्याचा आरोप असलेले प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्‍यासाठी विधानपरिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजीनामा घेत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. 

मेहता यांच्या राजीनाम्‍याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. त्‍यामुळे  विधानपरिषदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. प्रकाश मेहता हे गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहेत. ‘म्हाडा’च्या अनेक भूखंडांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे  समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फक्‍त चौकशी करून काय होणार नाही, तर त्‍यांचा राजीनामा घ्‍या आशी मागणी विरोधकांनी केली आहे.

विधानसभेतही विरोधकांनी मेहतांच्या राजीनाम्‍यावरून गोंधळ घातला आहे. दरम्‍यान, मेहता यांच्यावर होत असलेल्‍या आरोपांच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या राज्‍य प्रभारी सरोज पांडे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्‍या मुंबईत पक्षपधारिकाऱ्यांची बैठक घेवून मेहता यांच्यावर होत असलेल्‍या आरोपांबाबत चर्चा करतील.

 

 

COMMENTS