मराठा समाजाला आरक्षण द्या, नुसत्या चर्चा नको अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराचा तास रोखून धरला. विरोधी सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी 20मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. विधानपरिषदेत सभागृह सुरू होताच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 9 ऑगस्टला मुंबईत होत असलेल्या मराठा मोर्चाकडे लक्ष वेधून घेत सत्ताधारी पक्षाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर आधी चर्चा करा, अशी मागणी केली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर 2014 च्या हिवाळी अधिवेशनापासून सातत्याने विविध मार्गाने सभागृहात विषय उपस्थित केला जात आहे. मराठा समाज सातत्याने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात्मक भूमिका घेत आहे. या विषयावर चर्चा खूप झाल्या, नुसत्या चर्चा नको तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा अशी मागणी करत प्रश्नोत्तराचा तास रोखून धरला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आरक्षण द्या अशी मागणी लावून धरली. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सभापतींनी सभागृहाच कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले.
COMMENTS