“मुलांनो, यस सर, यस मॅडम नको, जय हिंद म्हणा”

“मुलांनो, यस सर, यस मॅडम नको, जय हिंद म्हणा”

शाळेतील मुलांनी आता हजेरी देताना ‘जय हिंद म्हणा’ असा आदेश मध्य प्रदेश सरकारने दिला आहे. सरकारमधील शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी हा आदेश काढला असून. 1 ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे. सुरुवातीच्या काळात सतना जिल्ह्यात त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळांमध्ये या आदेशाचे पालन केले जाईल.

मध्य प्रदेश  सरकारच्या या आदेशामुळे वाद निर्मिण होण्याची शक्यता आहे. वर्गात हजेरीच्या वेळी यस मॅडम/ यस सर बोलण्याऐवजी ‘जय हिंद’ बोलण्याचा प्रयोग सतनामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात याबद्दलचा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांमध्ये या आदेशाची जबरदस्तीने अंमलबजावणी केली जाणार नाही. मात्र हा आदेश देशभक्तीशी संबंधित असल्याने खासगी शाळादेखील त्याची अंमलबजावणी करतील, अशी आशा आहे,’ असे विजय शाह यांनी सांगितले.

COMMENTS